Tech

Digital Banking in Marathi डिजिटल बँकिंग बद्दल माहिती २०२१

Digital Banking in Marathi

Digital Banking in Marathi डिजिटल बँकिंग म्हणजे काय आहे आणि ते कसे सुरू करायचं. त्या साठी काय खर्च येतो ते सगळं आज आपण या लेखाद्वारे माहिती करून घेऊ या.

सध्या कोरोना महामारीच्या परिस्तिथी मध्ये गर्दीच्या ठिकाणी जाणे म्हणजे एक टेन्शनच झाले. आणि बँके मध्ये गर्दी बघून आणखीच भीती वाटते. त्यात प्रत्येक व्यवहार करण्यासाठी लांब रांगेत उभे राहावं लागत आणि जसा आपला नंबर लागतो तर जेवणाची वेळ सुरू होते. आता या सगळ्याची काळजी करणं सोडून द्या कारण तुम्ही इंटरनेट बँकिंग या डिजिटल बँकिंग बद्दल माहिती घ्यायला आले आहात तर तुमचं अर्ध टेन्शन तसेच दूर होईल.

तुम्हाला या लेखाद्वारे Digital Banking in Marathi डिजिटल बँकिंग बद्दल संपूर्ण माहिती मिळणार. चला तर वेळ वाया न घालवता सुरू करू या.

डिजिटल बँकिंग म्हणजे काय ? Meaning of Digital Banking in Marathi

Net Banking in Marathi

डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन बँकिंग ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच होतो तो म्हणजे इंटरनेट बँकिंग. इंटरेट बँकिंग ला नेट बँकिंग सुद्धा म्हणतात. डिजिटल बँकिंग हे एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टिम आहे जे बँक आणि वित्तीय संस्था द्वारे ग्राहकाला वित्तीय संस्थेच्या वेबसाईट द्वारे वित्तीय व्यवहार (Financial transaction) करण्यासाठी दिलेले आहे.

म्हणजेच डिजिटल बँकिंग गाहकांच्या बँकेच्या खात्यातून आर्थिक आणि इतर आर्थिक व्यवहार करण्यास मदत करते. इंटरनेट असे माध्यम आहे ज्यामुळे तंत्रज्ञान शक्य आहे.

डिजिटल बँकिंग कसे सुरू करायचं ? How to Start Digital Banking ?

  • कोरोना मुळे बँका घरी बसल्या बँकिंग सुविधा मिळत आहे.
  • एटीएम नसतांनाही एटीएम मशीन मधून काढू शकता पैसे (Cardless Transaction)
  • इंटरनेट बँकिंग ब्राउजर आणि अप्लिकेशन द्वारे वापरात
  • डिजिटल बँकिंग द्वारे तुम्ही घरी बसून रिचार्ज, विद्यूत बिल भरणे इत्यादी कामे करू शकता.
  • नेहमीच्या म्हणजे जुने खातेदारांना ऑनलाईन फॉर्म भरून स्वतः बँकेत हजर राहून नेट बँकिंग सुरू करावं लागते.
  • काही बँक आपल्याला नवीन खाते तयार करतो तेव्हाच सोबत डिजिटल बँकिंग सुविधा देते.

Digital Banking in Marathi डिजिटल बँकिंग करण्यासाठी ग्राहकांना लॅपटॉप किंवा मोबाईलचा उपयोग घेऊन इंटरनेट द्वारे व्यवहाराचे देवाण घेवाण करता येते. डिजिटल बँकिंग सुरू करण्यासाठी खाली स्टेप्स दिल्या आहे.

आपल्याला स्वतः बँकेच्या एखाद्या शाखे वर जाऊन आपली ओळख करून द्यावी लागते त्या शिवाय बँक कोणतेच व्यवहार करण्याची आपल्या परवानगी देणार नाही. त्या साठी आपल्याला आपली ओळख पत्र आणि बँकेची कागदपत्र सोबत घेऊन जावे लागतात.

तुम्ही अजून पण बँक खाते उघडले नसेल तर तुम्हाला खाते उघडायच्या वेळेस अर्जावर इंटरनेट बँकिंग (बरोबर चिन्ह) अशी खूण करावी लागते. या बँकेच्या कर्मचाऱ्याला विचारू शकता. या साठी तुम्हाला बँका एकाच फीज आकारणी मध्ये नेट बँकिंग म्हणजे डिजिटल बँकिंग, फोन बँकिंग, मोबाइल बँकिंग, अस्या सुविधा प्रदान करते.

जेव्हा तुम्ही डिजिटल बँकिंग सेवा सुरू करता, त्या नंतर तुम्ही नेट बँकिंग च्या पासवर्ड च्या (डिजिटल लॉक) माध्यमातून तुम्ही तुमच्या बँकेची रक्कम आणि स्टेटमेंट ( पासबुक एन्ट्री) मोबाईल वर बघू शकता. बँकेत न जाताही तुम्ही बँकेचे सगळे व्यवहार घरी बसूनच करू शकता.

एटीएम ATM नसतांनाही तुम्ही एटीएम मशीन ATM Machine मधून पैसे कधी काढू शकता.त्या साठी SBI YONO App चा वापर करावा लागतो. रिचार्ज, विद्युत बिल पण भरू शकता एटीएम मध्ये न जाताही व्यवहार करू शकता.

डिजिटल बँकिंग सुरू करण्यासाठी यादी स्टेप्स Steps For Start Digital Banking in Marathi

१) तुमचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेतून या बँकेच्या ऑफिसिअल वेबसाईट वरून नेट बँकिंग चा फॉर्म डाउनलोड करा.

२) सर्व नीट वाचा सगळे कागद पत्र जवळ ठेवून चुकीची माहिती आणि खोडतोड न करता भरून घ्या. त्यानंतर बँकेत जमा करा.

३) बँके कडून संपूर्ण तपशील तपासल्या नंतर बँकेद्वारे Digital Banking in Marathi डिजिटल बँकिंग सुरू करण्यात येते. डिजिटल बँकिंग वापरण्यासाठी लागणार कस्टमर आय डी (Customer ID) आणि तात्पुरता पासवर्ड (Temporary Password ) आपल्याला पत्रा द्वारे कळवला जातो.

४) डिजिटल बँकिंग चालू (Activate) करण्यासाठी बँकेच्या वेबसाईट वरून जाऊन नेट बँकिंग सेकशन मध्ये कस्टमर आय डी (Customer ID) आणि तात्पुरता पासवर्ड (Temporary Password ) चा उपयोग करून लॉगिन करा आणि नंतर पासवर्ड सेट करा.

जर आपल्याला यात काही अडथडा आल्यास बँकेच्या हेल्पलाईन नंबर वर कॉल करून तुम्ही मदद घेऊ शकता. हेल्पलाईन नंबर बँकेच्या वेबसाईट website वर दिले असतात.

बँकेच्या व्यवहाराचे प्रकार Types of Transaction in Marathi

डिजिटल बँकिंग मध्ये ३ प्रकारे व्यवहार करता येतो.

१) NEFT (नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर)
२) RTGS (रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट)
३) IMPS (इमिडिएट पेमेंट सर्विस)

१) NEFT (नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर)

NEFT हा व्यवहाराचा प्रकार आहे. या प्रकारामध्ये सर्वे व्यवहार टप्याटप्यात (Batchwise Processing) पूर्ण केले जाते. त्या मुळे हि प्रक्रिया हळू वार (Slow Process ) काम करते. जेव्हा तुम्ही एखादा व्यवहार NEFT द्वारे करता तेव्हा तो Batch मध्ये ऍड केल्या जातो. व्यवहार तुमचा Batch नंबर आल्यावर पूर्ण होतो.

NEFT करण्याची वेळ: सोमवार ते शनिवार ( दुसरा आणि चौथा शनिवार सोडून ) सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:३० पर्यंत.

NEFT करण्याची मर्यादा: NEFT द्वारे व्यवहार करण्यासाठी काहीच मर्यादा नाही

२) RTGS (रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट)

RTGS मधे केलेला व्यवहार Real-time मधे केल्या जातो.
उदा. जर तुम्ही एखादयला व्यवहाराची माहिती दिली तर त्याला लगेच बँकेद्वारे कळवल्या जाते. आणि व्यवहार पूर्ण होतो.

RTGS करण्याची वेळ: सोमवार ते शनिवार ( दुसरा आणि चौथा शनिवार सोडून ) सकाळी ८:०० ते संध्याकाळी ४:३० पर्यंत.

RTGS करण्याची मर्यादा: किमान २ लाख रु. ते अमर्यादित रक्कमेचा व्यवहार केल्या जाऊ शकतो.

३) IMPS (इमिडिएट पेमेंट सर्विस)

IMPS मध्ये केलेले व्यवहार या पाठवलेले पैसे समोरच्या व्यक्तीच्या खात्या मध्ये लगेच जमा होतात. सर्व व्यवहार Realtime मध्ये पूर्ण होतो.
उदा. आपण जर एखाद्याला पैसे पाठवले की लगेच त्या व्यवहाराचे स्वतंत्रपणे हाताळणी करून लगेच समोरच्या व्यक्तीच्या खात्यात दिसू लागतो. असं हा व्यवहार पूर्ण केल्या जातो.

IMPS करण्याची वेळ: २४*७ (दिवस आणि रात्र) आपण २४ तास मध्ये कधीही आणि आठोळ्याच्या सात हि दिवस व्यवहार करू शकतो.

IMPS करण्याची मर्यादा: २ लाख रु. प्रतिदिन

या लेखा द्वारे आम्ही तुम्हाला Digital Banking in Marathi डिजिटल बँकिंग बद्दल थोडक्यात माहिती दिली. ते तुम्हाला आवडली असणार. तुम्हाला या लेखा बद्दल काही आक्षेप असतील तर आम्हाला कंमेंट आणि Mail मेल द्वारे कळवा.तुम्हाला आणखी कशा बद्दल माहिती लागली तर आम्हाला Comment Box मध्ये कळवा.

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Tech