Var Vadhuche Ukhane in Marathi, उखाणा म्हणजे, वधू ने वराचे नाव घेण्याचे उखाणे, वराने वधूचे नाव घेण्याचे उखाणे, Meaning of Ukhane in Marathi
उखाणा ही हिंदू जीवन पद्धतीने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे . त्यामुळे त्यांचा मंगल प्रसंगी तरी उपयोग होतोच नवीन वधू वराना नाव कसे घ्यावे असे खास उखाणे संग्रह देत आहोत.
उखाणे म्हणजे काय? Meaning of Ukhane in Marathi
उखाणा म्हणजे पती अगर पत्नीचे नाव गुंफून सुंदर शब्द रचने ने यमक साधून तयार केलेले मनोगत! पिढ्यानपिढ्या चालत आलेले हे उखाणे म्हणजे लोक वाड्मयाचा अनमोल असा खजिनाच.
वधू ने वराचे नाव घेण्याचे उखाणे Ukhane in Marathi for Bride
१. मंदिरात वाहते, फुल आणि पान,
…रावांचे नाव घेते,ठेऊन सर्वांचा मान.
२. संसार रुपी वेली चा ,गगनात गेला झुला,
…रावांचे नाव घेते ,आशीर्वाद द्यावा मला.
३.कपाळावर कुंकू ,हिरवा चुडा हाती,
…राव माझे पती ,सांगा माझे भाग्य किती.
४.आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
…राव हेच माझे अलंकार खरे.
५.ताजमहाल बांधायला,कारागीर होते कुशल,
…रावांचे नाव घेते ,तुमच्या साठी स्पेशल.
६. खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
…रावांचे संसारात ,स्वर्गाचा आनंद.
७.पूजेच्या साहित्यात, उदबत्तीचा पुडा,
…रावांच्या नावाने ,भरला सौभाग्याचं चुडा.
८.जन्म दिला मातेने,पालन केले पित्याने,
…रावांचे नाव घेते, पत्नी या नात्याने.
९.चंडीचे जोडावे पतीची खून,
…रावांचे नाव घेते,…ची सून.
१०.दरी होता टेबल, त्यावर होता फोन,
…रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं| कौन?
११.गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
…रावांचे नाव घेते,सौभाग्य माझे.
१२. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे,
…रवांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.
१३.केसात मळते रोज,मी गुलाबाचे फुल,
…राव माफ करतात माझी प्रतेक भुल.
१४.पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागले चाहूल ,
…रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.
१५.गळ्यात मंगळसूत्र, मंगळ सूत्रात डोरल,
…रावांचे नाव माझ्या हृदयात कोरल.
१६.इंग्रजी भाषेतील चंद्राला म्हणतात मून,
… रावांच नाव घेते…सून.
१७.गुलाबाच्या फुलाची लाजवाब सुगंध,
…रावाना केले मी हृदयात बंद.
१८.सोन्याच्या ताटात चादीची वस्ती,सात जन्म घेईल मी.
… रावा साठी.
१९.रोज माझ्या अंगणात रांगोळी सजते,
…रावांच्या डोळ्यात सदैव माझेच प्रतिबिंब दिसते.
२०.दोन वाती दोन ज्योती,दोन शिंपले दोन कोटी,
… रावाची राहो मी अखंड सौभाग्य वती.
२१. वन, टू, थ्री,
…रावांचे बोलणे एकदम फ्री.
२२.सौभाग्याचं लेण काळी पोत,
…रावांच्या जीवनात उजलीन जीवन ज्योत.
२३.शूटिंग, शर्तींग, कटपिर्सेस,
…राव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस.
२४.तील गूळ घ्या गोड गोड बोला,
…रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला.
२५.संक्रातीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व,
…रावांचे नाव घेते आज हळदी कुकवाचे महत्व.
२६.कवीच्या कवितेत मोरोपंतांच्या आर्या,
…रावांचे नाव घेते…भर्या.
२७.तान्हाजी शिवाजी जिवलग मित्र,
…रावांनी आणले माझ्यासाठी मंगल सूत्र.
२८.श्रावणात महादेवाला दुधाचा अभिषेक,
…रावांच्या नावाने भेल वाहिले एकशे एक.
२९.चांगली पुस्तके आहे माणसाचे मित्र,
…रावांच्या सहवासात रांगविते संसाराचे चित्र.
३०.नयन रम्य बागेत नाचत होता मोर,
…रवांसरखे पाती मिळाले भाग्य माझे थोर.
हे सुद्धा बघा नवीन उखाणे वर वधू साठी
वराने वधूचे नाव घेण्याचे उखाणे ukhane in Marathi for Groom
१.काय जादू केली,जिंकल मला एका क्षणात,
प्रथम दर्शनी भरली…माझ्या मनात.
२.सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फूल,
संसार करू सुखाचा…टू, मी आणि एक मूल.
३.लग्नाचा वाढदिवस करू साजरा,
…तुला आणला मोग्र्याचा गजरा.
४.नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री,
…आज पासून माझी गृहमंत्री.
५.नीले पाणी, नीले डोंगर,हिरवे हिरवे रान,
…चे नावघेऊन राखतो सर्वांचा मान.
६.पुढे जाते वासरू, मागून चालली गाय,
…ल आवडते नेहमी दुधावरची साय.
७.काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,
…सोबत जीवनात मला आहे आनंद.
८.भारत देश स्वतंत्र झाला,इंग्रज गेले पळून,
…चे नाव घेतो जरा पाहा मागे वळून.
९.पर्जण्याचा वृष्टीने सृष्टी होते हिरवी गर,
…क्या गळ्यात घातली मंगल सूत्राचा हार.
१०.भाजीत भाजी मेथीची,
…मझी प्रितीची.
११.इंग्लिश भाषेला महत्व आले फार,
…ने माझ्या संसाराला लावला हातभार.
१२.सूर्याने दिली साडी चोळी आणि गोप,
…रावांच्या मांडीवर…घेते झोप.
१३.हिर्यचा कंठ मोत्याचा घाट,
…क्या हुधीसाठी केला सगळं थाट.
१४.चौकोनी आरशाला वाटोळी फेम्,
माझ्या लाडक्या…वर माझे खरे प्रेम.
१५. चित्रकाराने केली फलकावर रंगाची उधळण,
…चे नाव भासे जणू माणिक मोत्यांची उधळण.
१६.मातीच्या चुली घालतात घरोघर,
…झालीस माझी आता चल बरोबर.
१७.हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात,
…क्या जीवनात लाविली मी प्रितीची फुलवात.
१८.सोन्याची सुंपली, मोत्यानी गुंफली,
…राणी मझी घटकांत गुंतली.
१९.अस्सल सोने चौवीस कॅरेट,
…अन् माझे झाले आज मॅरेज.
२०.जाई जुई क्या फुलांचा दरवळला सुगंध,
…क्या सहवासात झाली मी धुंद.
२१.चंद्रा पाहून भरती येते सागराला,
…ची गोड मिळाली माझ्या जीवनाला.
२२.मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
…बरोबर बांधली जीवन गाठ.
२३.आपल्या देशात करावा हिंदी भाषेचा मान,
…चे नाव घेतो एका सर्व देऊन कान.
२४. बहरली फुलांनी निशिगंधा ची पाती,
…चे नाव घेतो लग्नाच्या राती.
२५.अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा ,
…ल घस घालतो वरण भात तुपाचा.
२६.हिऱ्यांचा कंठ मोत्याचा घाट,
…क्या हौशी साठी सगळं थाट.
२७. ताऱ्यांच लूक लुकण चंद्राला आवडल,
…मी जीवन साठी म्हणून निवडलं.
२८.विज्ञान युगात माणूस करतोय निसर्गावर मात,
…क्या अर्धांगिनी म्हणून घेतला मी माझ्या हातात हात.
२९.देवाला भक्त करतो मनोभर वंदन,
…मुळे झाले संसरणे नंदन.
३०.अंगणात होती तुळस ,तुळशीला घालत होती …
पाणी,आधी होती आई बापाची तान्ही आता आहे …ची राणी.