Health Tips

Anxiety meaning in Marathi चिंतेचा आजार आहे का घ्या जाणून

Anxiety meaning in Marathi
Image Credit: Merisaheli

anxiety meaning in marathi, Causes of Anxiety in Marathi

anxiety meaning in marathi आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळेस आमचे शिक्षक आम्हांला म्हणायचे चिंता हे चिता समान आहे. दोन्ही शब्दात फक्त अनुस्वाराचाच फरक आहे. चिता हे मनुष्याच्या मरण पावल्या नंतर जाळते परंतु चिंता हे जिवंतपणे मनुष्याला जाळत राहते.

तुम्ही खूप चिंता करता बरोबर ? तुम्हाला चिंता म्हणजे काय ? anxiety meaning in marathi आणि कमी करण्यासाठी काय उपाय आहे व यासाठी काय करावं असे बरेच प्रश्न पडले असतील. तुम्हाला चिंता कशी कमी करायची या बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहेत.

या लेखात आपण जाणून घेऊ या चिंता म्हणजे काय, चिंता करण्याचे प्रकार,चिंतेची लक्षणे आणि चिंता व काळजी साठी उपाय तर चला आपण तूमची चिंता दूर करूया

Table of Contents

Anxiety meaning in Marathi चिंता म्हणजे काय?

सरळ आणि सोप्या भाषेत चिंता म्हणजेच काळजी होते. चिंता हि आपल्या शरीराच्या रचलेतील ताणतणावाची नैसर्गिक प्रतिक्रिया असते. Anxiety meaning in Marathi with example समोर काय घडेल, कस होईल या बद्दलची भीतीची भावना आहे. शाळेचा पहिला दिवस, नवीन व्यक्ती सोबत संवाद साधने, नोकरीच्या मुलाखतीत जाणे, भाषण देणे या सारख्या वेग वेगळ्या गोष्टीमुळे लोक भयभीत आणि चिंताग्रस्त होऊ शकतात.

चिंता हि भावनिक आणि शारीरिक स्वरूपाचा अनुभव. प्रत्येक व्यक्ती नुसार वेगळी असते. काळजी हि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात लागलेलीच आहे.

Anxiety Helpline Number चिंताग्रस्त असल्यास फोन करा

निरोगी मन हे निरोगी शरीराइतकेच महत्वाचे आहे. आपण तणावग्रस्त किंवा चिंताग्रस्त असल्यास, राष्ट्रीय (टोल फ्री) हेल्पलाइनवर कॉल करा 080-46110007

Causes of Anxiety in Marathi चिंता करण्याची साधारण कारणे

चिंता करण्यामागेही काही कारणे असतात, सध्याच्या धावपळीच्या काळात सगळ्यांच्याच आयुष्यात अश्या काही गोष्टी घडतात कि जने करून ते चिंता करण्याचे कारण बनतात.

काळजी करण्याचे हि ५ मुख्य कारणे आहेत चला तर मग आपण ते जाणून घेऊ या.

१) कामाचा ताण (Workload)
२) नात्यांमध्ये येणाऱ्या अडचणी (Relationship Problems)
३) आर्थिक अडचणी ( Financial Problembs)
४) सतत आजारपण (Medical Illness)
५) व्यसनाधीनता (Addiction)

१) Workload कामाचा ताण

Anxiety meaning in Marathi
Image Credit: News18

हल्लीच्या काळात सगळीकडे या सगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सगळेचजण खूप धडपड करत असतात. कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या घेणं म्हणजेच जास्त काम घेऊन ते पूर्ण लवकरात लवकरत कसे द्यावे याचा ताण या टेन्शन घेणं हा तर काही व्यक्तींचा स्वभावच झाला असं म्हणायला काही हरकत नाही.

दिलेल्या वेळात ते काम पूर्ण करून देण्याच्या नादात आपण स्वःच्या शारीरिक आणि मानसिक येणाऱ्या ताणाला दुर्लक्ष करतो. कारण आपल्याला त्या वेळेस आपल्या आरोग्यापेक्षा हि जास्त महत्वाचं म्हणजे ते काम पूर्ण करून देणं आहे असं त्यावेळी वाटते. कदाचित हेच चिंता करण्याचं प्रमुख कारण असावे.

आपल्या इच्छेच्या लोभांला पूर्ण करण्यासाठी झटताना येणारा ताणाचे रूपांतर चिंतेत कधी होते ते आपल्याला कळत सुद्धा नाही.

२) Relationship Problems नात्यांमध्ये येणाऱ्या अडचणी

आता कामाचा ताण. जीवनशैली याच्या सगळ्याचा परिणाम आपोआपच नात्यांवर होतो. सध्या समोरच्यांना ऐकून घेण्याची सवय कमी झाल्यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. काही व्यक्तींना अहंकार मुळे चूक असतांना या नसतांना माफी मागयला सुद्धा लाज वाटते.

पर्यायी नात्यांमध्ये आलेला हा तणाव चिंता वाढवण्याचे कारण आहे. मनुष्याने किती हि आपल्या मनाला एकटा राहतो असं म्हटलं कि त्याला आतून हूर हूर लागतेच आपलं असं माणूस हवं असत अशा वेळी नात्यातली कटुता सोडवतांनी अनेक अडचणी निर्माण होतात.

पण एका फटक्यात सगळं सुरळीत व्हावं अशी अपेक्षा आपली असते. असे झाले नाही तर आपल्या मनात विचारांचे काहूर माजते आणि त्याचे रूपांतर चिंतेत होते.

३) Financial Problembs आर्थिक अडचणी

आर्थिक अडचणी सगळ्यांच्याच जीवनातील चिंतेचे कारण बनते. खर्च आणि बचत याचे जर गणित जुडले नाहीत तर हि आर्थिक अडचण त्रास दायक ठरू शकते. अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे कि अनेकांचे चिंतेचे कारण आर्थिक अडचण असते. आर्थिक अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी काही लोक वाईट मार्ग हि निवडतात.पैश्यांचे सोंग कधीही आणता येत नाही. ज्याचे पैस्याचे नियोजन बरोबर नसेल त्याच्या चिंतेचं कारण आर्थिक अडचणी बनू शकते.

४) Medical Illness सतत आजारपण

नेहमी नेहमी आजारी राहणे पण चिंतेचं कारण बनू शकते. आजारपण मध्ये अनेक जण आपले आयुष्य यांच्या सारखे का नाही असा विचार करत बसतात. रुग्णांसोबतच त्याच्या जवळच्या व्यक्तींना हि त्याची चिंता सतावत असते. आपल्यासोबतच असे का होते या बाबद काही व्यक्ती एवढा ताण घेतात कि, त्यांना आयुष्य जगावंसं नाही वाटत. याच मुळे सतत आजारपण हि चिंते मागचे कारण असू शकते.

५) Addiction व्यसनाधीनता

व्यसनांच्या आहारी जाण्यामागचे पण कारण चिंताच असू शकते. काही व्यक्ती चिंता नाही करण्यासाठी व्यसनांच्या आहारी जातात. परंतु व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांच्या चिंतेचे प्रमाण आणखी वाढू शकते. व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना याच्या बाहेर पडण्याची इच्छा असते. पण काहीही .केल्या ते त्यातून बाहेर पडत नाहीत. त्यामुळे असे होते कि माणूस आणखी चिंताग्रस्त होऊन जातो.

Types of Anxiety चिंता करण्याचे प्रकार

तुम्ही पण विचारत करत असाल कि चिंतेचे पण प्रकार असतात.हो तुम्ही करत असलेल्या चिंतेचे हि काही प्रकार आहेत. ते तुम्हाला माहित आहे का ? चला तर मग ते आपण आज जाणून घेऊ या

चिंतेचे ४ प्रकार आहेत

१) Social Anxiety Disorder सोसिअल अँक्सिएटी डिसऑर्डर
२) Panic Attack पॅनिक अटॅक
३) Obsessive-compulsive disorder (OCD) ओसिडी
४) Post-traumatic disorder (PTSD) पिटीएसडी

१) Social Anxiety Disorder सोसिअल अँक्सिएटी डिसऑर्डर

सोसिअल अँक्सिएटी डिसऑर्डर म्हणजे कि तुम्हाला एकाद्या नवीन व्यक्तीशी बोलण्यात नेहमी पेक्ष्या जास्त भीती वाटणे. कारण अशे व्यक्ती रोज रोजच्या काही गोष्टी झाल्या कि घाबरतात.

२) Panic Attack पॅनिक अटॅक

काही व्यक्तींना इतका ताण घेण्याची सवय असते कि, ते या काळजीमुळे स्वतः वर नियंत्र नाही ठेऊ शकत. त्यांच्या हातापायांना थरथराट सुटते. काही तरी रडतात सुद्धा आणि धडपड करू लागतात जेव्हा तुम्हाला असे लक्षण दिसत असणार तर समझून जा कि तुम्हाला पॅनिक अटॅक आलाय.

३) Obsessive-compulsive disorder (OCD) ओसिडी

Obsessive compulsive disorder म्हणजे कदाचित जे व्यक्ती नेहमी अति स्वच्छता व नीट नेटकेपणा ठेवतो. असे व्यक्ती नेहमी स्वच्छतेला पहिले प्राधान्य देतो आणि ते अजिबात घाण असलेल्या ठिकाणी राह्यला नाही पाहत. असं झाले कि त्या व्यक्तींना वाईट होण्याची भीती वाटते. तुम्हाला असे काही जाणवत असेल तर तुम्हाला OCD चा त्रास असू शकतो.

४) Post-traumatic disorder (PTSD) पिटीएसडी

हे मानसिक आजाराशी संबंधित आहे. पिटीएसडी Post traumatic disorder (PTSD) म्हणजे असा व्यक्ती जो आपल्याच भूतकाळ मध्ये गुंतवून राहतो या फ्लॅशबॅक येऊ लागतो. एखाद्या घटनेचा त्या व्यक्तीवर इतका वाईट परिणाम झालेला असतो कि, त्यांना घटने बद्दल स्वप्न पडू लागतात. सतत वाईट स्वप्नमुळे त्यांना आजूबाजूला त्यांच्या स्वप्नाप्रमाणे काही वाईट घडते असे जाणवते आणि त्या मुले त्यांना त्याची चिंतासतावू लागते.हा त्रास वाढत गेला कि, तो व्यक्ती कुडत जाते.

Anxiety symptoms in Marathi चिंता करण्याची लक्षणे

सामान्य चिंताग्रस्त अस्वस्थता Generalized anxiety disorder असलेले माणसं वैयक्तिक आरोग्य काम, रोजरोजच्या जीवनातील परिस्तिथी अस्या बऱ्याच गोष्टी बद्दल कमीत कमी ६ महिने जास्त चिंता व काळजी दाखवतात. भीती आणि चिंतेमुळे जीवनातील समस्या,शाळा, कार्यालयीन क्षेत्रामध्ये यासारख्या बऱ्याच महत्वपूर्ण समस्या निर्माण होऊ शकतात.

शारीरिक सामान्य चिंतेची लक्षणे यात दिली आहेत. physical anxiety meaning in marathi

  • सतत अस्वस्थता वाटणे
  • सहज थकल्या सारखे वाटू लागणे
  • लक्ष नाही राहणे, मनात हुरहूर वाटणे
  • चिडचिड होणे
  • स्नायू मध्ये ताण येणे
  • घाम फुटणें
  • वृदयात धड धड वाटणे
  • झोप न लागणे

चिंता व काळजी असल्यास या सारख्या लक्षणे जाणवतात.

Is anxiety a Mental Disease? चिंता करणे हे मानसिक आजार आहे

अधून मधून चिंता करणे हे चांगले आहे.परंतु चिंताग्रस अस्वस्थता वेगळे आहेत. ते मानसिक आजाराचा समूह आहेत ज्याच्या मुळे नेहमी आणि खूप चिंता आणि भीती वाटू लागते. जास्त चिंता करणे आपल्याला शालेय, कार्य, कुटुंबासोबत आणि सामाजिक परिस्तिथी टाळण्यास कारणीभूत ठरू शकते ज्यामुळे आपली लक्षणे वाढू आणि आणखी वाईट होऊ शकतात.

How can I reduce anxiety in Marathi मी चिंता करणे कसे कमी करू

जेव्हा तुम्ही चिंताग्रस्त आणि तणावात असाल तर हे करून पहा.

  • Take a time-out स्वतःसाठी वेळ काढा

योगाचा सराव करा, ध्यान साधना करा, संगीत ऐका, मालिश करा किंवा विश्रांतीची तंत्रे शिका. समस्या पासून दुर रहाल तर आपल्या डोक शांत राहण्यास मदत होते.

  • Eat well-balanced meals संतुलित आहार घ्या

कोणत्याही जेवणाचा वेळ चुकवू नका, आरोग्यासाठी ऊर्जा वाढविणारे आहार हातावर ठेवा.

  • दारू आणि कॉफी सार चे सेवन कमी करा

यामुळे चिंता वाढू शकते आणि पॅनिक अटॅक येऊ शकतो.

  • पुरेशी झोप घ्या

डॉक्टर सांगतात कि मनुष्याला ८ तास झोप घेणे शरीरासाठी चांगले असते. ताणतणाव असतांना आपल्या शरीर ला अतिरिक्त झोप आणि विश्रांतीची आवश्यकता पाहिजे असते.

  • व्यायाम करा

आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी रोज व्यायाम केले पाहिजे. चिंता कमी करण्यासाठी तुम्हाला रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्याने आपले आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करते

  • लांब श्वास घ्या

लांब श्वास घ्या आणि हळू हळू श्वास सोळा.

  • १० पर्यंत मोज हळू

हळू १० पर्यंत मोजा आणि गरज भासल्यास २० पर्यंत मोजा.

  • Talk to Someone संवाद साधा

मित्रांचा या आपल्या घरच्यांना तुम्हाला कस वाटतात आहे तुमच्या भावना बद्दल सांगा आणि ते आपली कशी मदद करू शकतात ते त्यांना विचारा. जास्त वाटल्यास डॉक्टर चा सल्ला घ्या.

6 Ways to Naturally Reduce Anxiety चिंता कमी करण्याचे ६ उपाय

चिंता,काळजी या साठी डॉक्टर तुम्हाला ठराविक औषध देऊ शकत नाही. पण तुम्हाला वाटेल कि तुम्ही चिंता करत आहेत. आणि तुमच्या आरोग्य वर परिणाम होत असेल तर तुम्ही त्या साठी काय करावं या कसे कमी करायचं या साठी खालील गोष्टी करायला हव्यात.

१) Keep Calm शांत राहा

तुमच्या समोर कितीही मोठे संकट आले तरी तुम्ही शांत राह्यला शिका. तुमच्या समोर कितीही मोठा पेच पडला असले तरी हि तुम्ही keep clam हे मंत्र तुमच्या मनाशी गाठ बांधून ठेवा, जितके तुम्ही शांत राहाल तितकेच मार्क तुम्हाला सापडणार त्या संकटातून बाहेर पडायला.

उदा. नौकरीच्या ठिकाणी कामाचा खूप मोठा भार तुमच्या वर पडला आहे. तुम्हाला काहीच तासामध्ये ते काम पूर्ण करून द्याच आहे. पण तुम्हाला माहित आहे हि गोष्ट शक्य नाही. तरी हि तुम्ही चिंता करता परंतु त्या वेळी चिंता करून काहीही होणार नाही. शांत राहून तुम्ही किती काम पूर्ण करू शकता ते आधी पाहा म्हणजे तुमच्या कामा मधला मोठा भार कमी होईल. होऊ शकते तुमचे काम पूर्ण नाही होणार.पण जितके कमी होईल तितकेच तुमच्यावरील तुमच्या कामाचा ताण कमी होईल.


२) Stop Negative Thinking नकारात्मक विचारांना देऊ नका थारा

काहींना तर नकारात्मक विचार करण्याची सवयच असते. नाकारात्मक विचार करणे तुमच्या चिंतेचे कारण असते. कोणत्या हि गोष्टी बाबद खूप जण नकारात्मक विचार करतात.

उदा. रोज ९:३० ला घरी वेळेवर येणारे बाबा जर घरी वेळेवर नाही आले कि आईच्या मनात वाईट विचार येऊ लागतात. आणखी त्यांचा फोन लागला नाही कि आईची चिंता वाढते. आईच्या मनात विचार यायला लागले कि, मग तिचे मन लागत नाही आणि सगळ्यांचेहि. त्यामुळे १ गोष्ट लक्षात ठेवा.क्षुल्लक गोष्टीवरून नकारात्मक विचारकणे बंद करा.

३) Meditation ध्यानसाधना

तुमच्या मनातील अतिरिक्त चिंता दूर करण्यासाठी तुम्ही ध्यानसाधनेचा उपयोग घेऊ शकता. तुमच्या मनातील वाईट विचार नाही आले पाहिजे या साठी तुम्ही ध्यानसाधनेचा उपयोग करू शकता. त्यामुळे तुम्हाला भरप्पूर फायदे होतील. तुम्ही तुमच्या ताणाला अगदी सोप्या पद्धतीने कमी करू शकता त्या साठी तुम्हाला ध्यानसाधनेचे वर्ग या classes मध्ये जाणे चालू करून द्या.

४) Yoga योगा

निरोगी राहयच असेल तर योगा करण्याचा सल्ला दिल्या जातो. जर तुम्ही नियमितपणे योगा केला तर तुमच्या मनात वाईट विचार येणार नाही. या मुळे तुमचे मन सुद्धा प्रसन्न राहील. नेहमी तुम्हाला सकारात्मक या चांगल्या गोष्टी सुचतील. त्या साठी तुम्हाला आवडीने योग करायला हवा. जर तुम्ही नियमित योगा करणार तर तुम्हाला लवकरच फरक जाणवेल.जर तुम्हाला कोरोना या लॉकडाऊन मुळे बाहेर जाऊन योगा नाही करावं वाटत असेल तर तुम्ही घरच्या घरी काही आसनं शिकायला हवी.

५) Excercise व्यायाम

नियमित व्यायाम करण्याची सवय तुम्हाला चिंतेतून दूर ठेवण्यात मदत करते. तुम्ही जर नियमितपणे व्यायाम करत असाल तर तुम्हाला चिंते पेक्षा तुमच्या शरीराची काळजी करण्यात लक्ष राहील. त्यामुळे तुम्ही आजारापासून दूर रहाल. तुम्हाला व्यायाम करण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्हाला त्याला दुर्लक्ष करून व्यायाम करायला सुरवात करा. तुमच्या घामासोबत तुमची चिंताही बाहेर पडायला मदत होते.

उदा. तुम्ही जर व्यायाम करत असाल तर कार्डिओ, फ्लोअर एक्सरसाईज केल्यास तुम्हाला जास्त फायदा मिळेल. त्यामुळे तुम्हाला आराम पण मिळेल.

६) Keep yourself busy स्वतःला गुंतवून ठेवा

चिंता करणे म्हणजे सतत विनाकारण विचार करत राहणे. जर तुम्ही कशातच गुंतलेले नसाल तर तुमचे डोके रिकामे असेल की विचार येणारच.जर तुम्ही तुमचे मन गुंतवून ठेवले की मात्र तुम्हाला विचार येणार नाही आणि तुम्हाला याचा त्रास पण नाही होणार.

anxiety meaning in Marathi लेख वाचून नक्कीच तुमचि थोडीफार चिंता कमी झाली असणार. तुम्हाला हा लेख कसा वाटला आणि तुम्हाला आणखी कश्या वर उपाय या माहिती लागली तर आम्हाला कळवा कंमेंट द्वारा.

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Health Tips