Besan Laddu Recipe in Marathi, स्वादिष्ट बेसन चे लड्डू रेसिपी, Besan Laddu in Marathi
माझ्या आई ने बनवल्या बेसनाचे लाडू ची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे.
चला तर मग आज आपण बनवूया एकदम साध्या आणि सरळ प्रकारे बेसन चे लड्डू.एखाद शुभकार्य असल तेव्हा आपण बनवू शकतो. लोक लड्डू हे खूप आवडीने खातात. फराळ म्हंटला की अनेक प्रकार चे लड्डू बनवल्या जाते.बेसन चे लड्डू बनवन काही कठीण नाही खूप सोप आहे.तसेच लड्डू हे आपण कधीही बनवून खाऊ शकतो अस नाही की ते बनवायला निमित्त लागत.
सामग्री :
१) २ कप बेसन
२) ३/४ कप साखर( पावडर)
३) १/२ कप तूप
४)बदाम( बारीक तुकडे)
५)पिस्ता (बारीक तुकडे)
६) १/२ इलायची (पावडर)
७)काजू (बारीक तुकडे)
८) जायफळ
कृती पहिली:
सगळ्यात आधी गॅस वर कढई ठेवा नंतर त्यामधे तूप टाका.तूप छान तापल्यावर त्यात बेसन टाका ते चांगल एकजीव करा.त्याला चांगले ब्राऊन रंग येई पर्यंत भाजून काढा .सुरवातीला बेसन कोरड राहील पण थोड्या वेळा नंतर तुपामुळे ते छान मिक्स होऊन पातळ होईल.त्याला ३०-४० मिनट गॅस कमी आचेवर ठेऊन भाजत राहा.ते चांगले भाजून झाल्यावर गॅस बंद करा .आणि ते मिश्रण थंड होऊ द्या.
कृती दुसरी :
नंतर त्या मधे साखरेची पिठी टाका छान मिक्स करून घ्या .आणि त्यात विलायची टाका मग काजू ,जायफळ, बदाम व पिस्ता चे तुकडे टाकून घ्या त्याला पूर्ण एकजीव होपर्यंत मिक्स करा. नतर त्याचे लड्डू बनवा सर्व लड्डू च आकार सारखाच येईल असे लड्डू करा.सर्व लड्डू झाल्यावर त्याचा वर बदाम पिस्ता चे तुकड्यांनी सजावट करा.
अशा प्रकारे घारघुती सामग्री मुळे छान चवदार बेसन चे लड्डू Besan Laddu in Marathi बनवता येत.