Marathi Ukhane, Ukhane Marathi, Marathi Ukhane for Bride, Marathi Ukhane for Groom
प्रत्येक समाजात विवाह हा जीवनाचा एक महत्वाचा भाग असतो, तसेच विवाह हा मानवी जीवनात एक प्रकारचा संस्कार असतो.
जरी प्रत्येकाची परंपरा आणि संस्कृती भिन्न आहेत, परंतु विवाह जगभरात कोठेही आनंददायक आहे.
भारतीय संस्कृतीप्रमाणे काही परंपरेत लग्नानंतर नववधू कधीही पतीचे नाव थेट घेत नाही, “उखाणा” द्वारे पतीची ओळख करण्याचा एक मार्ग आहे.
राज्यांनुसार ही प्रक्रिया भारतात बदलते आहे. काही निवडलेले ‘उखाणे’ Marathi Ukhane येथे आपण वाचू शकता.
एकतर आपण मनोरंजनासाठी प्रयत्न करू शकता किंवा आपण नवीन विवाहित असल्यास त्यांना वापरात आणू शकता.
नवीन नवीन लग्न झालंय? मग नव्या लग्नाची नवलाई सांगणारे नवे ताजे उखाणे Marathi Ukhane बघाच!
चला तर या लेखा मध्ये बघू आपण उखाणे Ukhane
मराठी उखाणे Marathi Ukhane
चंद्राला म्हणतात इंग्रजी मध्ये मून, माझ्या पती च नाव घेते मी आहे या घरची सून.
चांदीच ताट त्यावर ठेवली परात, परातीत ठेवाले गहू.
मला शरम येते ग बाई, माझ्या पती च नाव कस काय मी घेऊ.
कपड़े शिवता शिवता टोचली मला सुई,
…रावानी घेतला चिमटा मी म्हटले उई.
चमेलीचा आनंददायी वास, त्यात सर्वत्र हळूहळू हवा चालते
मी गोड नवर्याचे नाव घेऊन, मी हिरव्या बांगड्या घालते.
मोह नाही, जादू नाही, द्वेष नाही
..भांडण नाही माझ्या प्रेयसीचे नाव घेतो तिच्या शिवाय मला पर्याय नाही.
गुलाबाच्या फुलाचा येते सुंदर वास, मी भरवितो
…… ला जलेबी चा घास.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…रावाच्या नावाच मंगळसूत्र गळ्यात घालते प्रेमाने.
लाल लाल मेहेंदी, हिरवागार चुडा
…रावांमुळे पडला माझ्या जीवनात, प्रेमाचा सडा
निळे पाणी निळे आकाश, सर्वत्र सर्वत्र हिरवेगार हिरवे वन.
…रावा चे नाव घेते माझे आहे त्यांच्यात मन.
मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध,
…रावा सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद!
दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी,
…रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.
माहेरी साठवले, मायेचे मोती
…रावाच नाव घेऊन, जोडते नवी नाती !
… ची लेक झाली, … ची सून
…रावाच नाव घेते, गृहप्रवेश करून !
सासरचे निराजंन, माहेरची फुलवात
…रावांचे नाव घेण्यास, करते मी सुरुवात !
हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे
…रावा मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे !
माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप
…ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप!
सुर म्हणतो साथ दे……दिवा म्हणतो वात दे
सुर म्हणतो साथ दे…. दिवा म्हणतो वात दे
……रावाच्या नाव घेते
आता तरी मला घरात पाऊल टाकू दे
मंगळसूत्र, हिरवी कांकन चढला सौभाग्याचा साज
…… रावाची गृहलक्ष्मी म्हणून गृहप्रवेश करते आज.
योगायोगाने योग केला मिळवले योगावर
नियंत्रण रावांशी ठरले आहे लग्न…करते आग्रहाचे निमंत्रण.
सचिनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
रावाचे नाव घेते पाच गडी राखून.
इराणच्या चहाबरोबर मिळतो मस्का पाव
…रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव.
चांदीच्या ताटात मूठभर गहू लग्नच नाही झालं त नाव कस घेऊ.
कामाची सुरवात होते श्रीगणेशापासून
…रावांचे नाव घायला सुरवात केले आजपासून.
रुसलेल्या राधेला कान्हा म्हणतो हास
…रावांना भरवते पुरणाचा घास.
संसाररूपी सागरात पतिपत्नीची नौका
..रावांचे नाव घेते सर्वजण ऐका.
मुंबईची महालक्ष्मी कलकत्याची कालिका
रावांचे नाव घेते चिरंजीव बालिका.
मूर्तिकारांनी बनवली सुंदर मूर्ती रावांची वाढो सर्वदूर कीर्ती.
डाळीत डाळ तुरीची डाळ
रावाच्या मांडीत खेळवीन एका वर्षात बाळ.
मनी माझ्या आहे सुखी संसाराची आस तू फक्त मस्त गोड हास.
जमले आहे सगळे
…..च्या दारात रावांचे नाव घेते येऊ द्या ना घरात.
आकाशात चमकते तारे जमिनीवर चमकते हिरे
राव माझे हेच अलंकार खरे.
मंदिरात वाहते, फुल आणि पान
….. रावांचा नाव घेते ठेऊन सर्वांनाचा मान.
कपाळाच कुंकू जसं चांदण्याचा ठसा,
रावांचं नाव घेते, सारे जण बसा
शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान ठेवते वाकून
………रोजचे व्यवहार करा सोसिअलडिस्टंसिन्ग राखून.
हिमालय पर्वतवर शंकर पार्वती ची जोडी
रावांच्या जीवनात मला आहे गोडी.
आंबाच्या झाडावर
बसून कोकिळा करी कुजन
माझ्या नावाचं
…… करी पूजन
परसात अंगण, अंगणात तुळश
रावांचं नाव घ्याचा मला नाही आळस.
छम छम बांगड्या, छूम छूम पैंजण
रावांचे नाव घेते ऐका सारेजण.
सनई आणि चौघडा
वाजे सप्तसुरात
रावांचे नाव………च्या घरात.
जन्म दिला मातेने, पालन केले पिताने
रावांचे नाव घेते.. पत्नी या नातेने.
माहेरी साठवले..मायेचि मोती………
रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाती.
आमचे दोघांचे स्वभाव आहेत complementary……
रावांचे नाव घेऊन करते पटकन
घरात entry.
मिळून काम केल्यावर काम होतात लवकर
………मी चिरतो भाजी आणि रावं लावते कुकर.
ओल्या ओल्या केसाला टॉवेल द्या पुसायला
……. रावांचे नाव घेते साडी द्या नेसायला.
हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट.
रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे
…….रावांचं नाव घेतो लक्ष द्या सारे.
काय जादू केली जिंकलं मला एका क्षणात
प्रथम दर्शिनीच भरले रावं माझ्या मनात.
पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी
…. रावामुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.
प्रेमाच्या चौकात कितीपण फिरा शोधून सापडणार नाही रावांसारखा हिरा.
मटणाचा रस्सा चिकन केले फ्राय
….. भाव देत नाही किती केले ट्राय.
तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट पण पण बघता बघता
रावांच्या प्रेमात पडली माझी विकेट.
श्री विष्णुच्या मस्तकावर सदैव असतो शेष
रावांचे नाव घेऊन करतो गृहप्रवेश.
राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न
दशरथला पुत्र चार
रावांनी घातला मला मंगळसूत्रचा हार.
जाई जुई च्या फुलांचा दरवळा सुगंध
रावांच्या सहवासात झालो मी धुंद.
स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाने
वाढवली शान……. रावांचे नाव घेतो
ठेऊन सर्वांचा मान.
कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास
मी भरवितो रावांना जलेबीचा घास.
पतिवरतेचा धर्म नम्रतेने वागतो
रावांचं नाव घेऊन आशीर्वाद मांगतो.
सासरचे निरांजन, माहेरची फुलवात
रावांचे नाव घेण्यास करते सुरवात.
माहेर जणु गंगा, सासर जणू सागर
त्यातच एकरूप….रावाचे सुख निरझर.
शिंपल्यात सापडले माणिक मोती
रावांच्या जीवनात झाले मी सारथी.
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
रावांचा आणि माझा जन्मोजन्माचा जोडा.
हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली तुशी
……रावांचे नाव घेते, सत्यनारायणाचा दिवशी.
चांदीच्या ताटात अगरबत्तीचा पुडा
….. रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा.
प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण
रावांचे नाव घेऊन सोडले कंकन.
चांदीच्या वाटीत साखरेचे खडे
रावांचं नाव घेते देवापुढे.
आकाशात उडतोय पक्ष्याचा थवा
रावांचं नाव घ्याय ला उखाणा कशाला हवा.
नवीन घरामध्ये, मन गेलं गांगरून
रावांच्या मायेची शाळा घेते पांघरून.
वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल
रावांच्या जीवनात टाकतो मी पाऊल.
निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
.. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.
सौभाग्याचा अलंकार लाल कुंकू काळ्या मण्याची पोत आणि काचेचे चुडेल
……. रावांचे नाव घेतो सत्यनारायच्या पुढे.
गुलाबाचे फुल वाऱ्यावर लागते डोलू
दिवसभर सुरु असते रावांचे गुलु गुलु.
ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल
…. रावांचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेसिअल.
टोपलीत टोपली टोपलीत भाज्या
…….. माझी राणी मी ticha राजा.
गव्हाचे पोते सुईने उसवले
……. ने मला मेक अप करून फसविले.
अंगणात पडतो पारिजातकचा सडा
रावांना आवडतो गरम बटाटेवडा.
श्रीकृष्णने केला पण रुक्मिणीलाच वरीन ,
रावांच्या सोबत आदर्श संसार करिन.
आग्रहखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा
रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा.
दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची
रावांचे नाव घेते सून मी या घराची.
आईने केले संस्कार बाबा ने केले सक्षम
रावं सोबत असताना संसाराचा पाया घेईल भक्कम.
एक होती चिऊ आणि एक होता काऊ
रावांचं नाव घेते डोकम नका खाऊ.
सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन
…रावं माझा हिरो मी त्यांची हिरोईन.
आत्ताराचा सुगंध दरवळला चहुकडे
रावांच्या नावाचा लौकिक होऊ दे सगळीकडे.
मराठी भाषा महाराष्ट्राची अस्मिता
रावांचे नाव घेते मी सौं चारुता.
अबोलीच्या फुलाचा गंध काही कळेना
रावांचे नाव घेण्यास शब्द काही जुळेना.
लाल मनी तोडले, काळे मनी जोडले
रावासाठी मी माहेर सोडले.
गोव्यावून आणले काजू
रावांच्या थोबाडीत द्यायला मी कशाला लाजू.
समुद्राचे पाणी लागते खूप खारे
……… तुझ्यासाठी तोडून आणीन मी चंद्र तारे.
अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य
रावांचा आनंदाने हेच माझे सौख्य.
मॉलमध्ये जायला तयार होते मी झटकन
रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन.
आतून मऊ पण बाहेर काटेरी साल
रावं दिसलें खडूस तरी मान मात्र विशाल.
भल्या पहाटे करावी देवाची पूजा
रावांच्या जीवावर करते मी मजा.
लहानसहान गोष्टींनीही आधी व्ह्याचे त्रस्त
रावं आल्यापासून झालाय, आयुष्य खूपच मस्त.
जाईच्या फुलाला आलाय बहार
27 मे ला घालतो रावला मी हार.
मान्सूनचे आगमन पर्जन्यांची चाहूल
रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल.
तुमचा आशीर्वाद राहो सदैव आमच्या पाठी
नक्की या जुडताना रावं आणि माझी रेशीमगाठी.
शितेसारखे चरित्र, रंभे सारखे रूप
रावांचे आहे मला अनुरूप.
बघता बघता वर्षे लोटली
रोज बघतो स्वप्नात सकाळी भेटली.
नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी,
रावं माझा राजा आणि मी त्यांची राणी.
लग्न झाले आता, आमची बहरू दे संसारवेल
….. रावांच नाव घेते वाजवून घराची बेल.
प्रेमाला नसते मोजमाप, नसते लांबी रुंदी
आज भरवते रावाला गोड बासुंदी.
चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ,
रावांचे नाव घेते, केला डोहाळजेवणाचा थाट.
सासूबाई आहेत प्रेमळ, वन्सबाई आहेत हौसी
…. रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.
मावळता सूर्य, उगवता शशी,
रावाचे नाव घेते डोहाळे जेवणच्या दिवशी.
बाळराजांची चाहूल, दरवळा परिसर
रावांच्या जीवनात होईल माझे जीवन सफल.
आनंदाचे कारंजे, मनी उडते थुई थुई
रावांच्या बाळाची आता होणार मी आई.
वोडाफोन एरटेल पेक्षा भारी आहे जिओ सिम
,…… रावं आणि माझ्याकडून, मानाचा जय भीम.
जेठालाल ची बायको असून फेव्हरेट आहे बबिता
……. रावांचे नाव माझे नाव सरिता.
पूजेला नाटण्यासाठी बायका असतात हौशी
…….. रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी.
सासरची छाया, माहेरची माया
रावं आहेत माझे हट्ट पुरवाया.
मोग्र्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध
रावांसोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद.
सुखी संसारात हवी, विश्वासाची जोड
रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोड.
मी नव्हती सुंदर तरी मला निवडले
रावांचे हेच रूप मला फार आवडले.
हो नाही म्हणता म्हणता, लग्न जुडले एकदाचे
..रावामुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
इंस्टाग्रामच्या बायोला टाकला आहे फुडी
रावं आहेत खूप मुडी.
आजचा दिवशी आहे आमच्यासाठी खास
…. रावांना भरवितें गुलाबजामूनचा घास.
डासामुळे होते डेंगू आणि मलेरिया
रावांना बघताच झाला मला लॅव्हेरिया.
मित्रांनो आपल्या लग्नात किंवा कोनत्याही पुजेत आपल्या नविन नवरी व नवरदेव साठी मराठी उखाणे Marathi Ukhane. तुम्ही कोनत्याही कार्यक्रमात मराठी उखाणे Marathi Ukhane नवरी साठी नावे घेऊ शकता. तर मित्रांनो तुम्हाला कशे वाटले उखाणे Ukhane ते नक्की सांगा.