Recipe in Marathi

मिसळ पाव । Misal Pav Recipe in Marathi

मिसळ पाव Misal Pav Recipe In Marathi
Image Credit: ahappytreat

Misal Pav मिसळ पाव हा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. मटकी च्या उसळ मध्ये कांदा, टोमॅटो, फरसन, तळलेले मसाले मिश्रण, लिंबाचा रस घालून हे बनवले जाते.

याला पाव सोबत वाढल्या जाते. महाराष्ट्र मधे बर्‍याच ठिकाणी मिसळ पाव आवडिने खाल्ल्या जाते. खर तर मला मिसळ पाव आवडत न्हवते.

पण एकदा माझ्या आईने मिसळ पाव घरी बनवले. व तेव्हा पासून मिसळ पाव माझ्या आवडत्या महाराष्ट्रीयन नाश्त्याची एक रेसिपी आहे.

माझी आई घरी बर्‍याचदा मिसळ पाव बनवित असते. आज मी आपल्या सोबत माझ्या आई ची स्पेशल मिसळ पाव Misal Pav Recipe in Marathi शेअर करत आहे.

महाराष्ट्रात मिसळ बनवण्याचे अनेक प्रकार आहेत. सहसा मटकी च्या उसळ पासून मिसळ बनवली जाते.

काही लोक सहसा मिसळ कमी मसालेदार बनवितात. परंतु कोल्हापुरी मिसळ हे खरोखर खुप मसालेदार मिसळ आहे.

मिसळ पाव आपण नाश्ता, स्नॅक किंवा जेवण मधेही घेऊ शकतो. हे एक चविष्ट आणि पौष्टिक जेवण आहे.

खासकरून जर पाव गव्हाच्या पिठापासून बनवले गेले असेल किंवा आपण स्वतः घरी पाव बनवू शकत असाल तर.

माझ्या आईची मिसळ पाव Misal Pav Recipie in Marathi नुसार मटकी ची उसळ वापरुन मिसळ बनवनार. या रेसिपीमध्ये मी घरगुती मटकी Sprouts वापरली आहे.

मिसळ पाव Misal Pav in Marathi चला तर बनवायला सुरुवात करुया

Misal-Pav-साहित्य
Credit: Ministry of Curry

साहित्य

 • 2 कप मटकी
 • 2 बटाटे
 • १/४ टीस्पून हळद
 • चवीनुसार मीठ
 • 1 कप पाणी
 • चिंच
 • 3 चमचे तेल
 • 2 चमचे आले लसूण पेस्ट
 • 1 कांदा (बारीक चिरलेला)
 • 1 चमचा मोहरी
 • 1 चमचा जिरे
 • कढीपत्ता
 • १ ते २ हिरव्या मिरच्या (चिरलेली)
 • 1 चमचा लाल तिखट
 • 1 चमचा धणे पावडर
 • अर्धा चमचा गरम मसाला
 • फरसाण / चिवडा
 • कोथिम्बीर
 • 1 लिंबू
 • 1 टोमॅटो (बारीक चिरलेला)

मिसळ पाव कसा बनवायचा How to Make Misal Pav in Marathi

प्रथम 2 कप मटकी पण्यानी स्वच्छ धुन घ्या. मटकी मधले पाणी चांगले झारून टाका आणि त्यांना प्रेशर कुकरमध्ये घाला. प्रेशर कुकरमध्ये २ मध्यम आकाराचे चिरलेले बटाटे, १/४ चमचे हळद आणि चवीनूसार मीठ घाला. पाणी मॅटकी वर सुमारे ½ इंच वर झाकलेले असावे.

मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या होइ पर्यंत प्रेशर वर शिजवा. एका छोट्या भांड्यात चिंचेला 25 ते 30 मिनिटे गरम पाण्यात भिजवा. चिंचेची पिळ काढा आणि लगदा काढा. चिंचेचा लगदा बाजूला ठेवा. सर्व मसाले मोजा आणि तयार ठेवा.

मिसळ पाव साठी उसळ ची Recipe in Marathi

दुसर्‍या पॅनमध्ये 3 चमचे तेल गरम करावे. प्रथम 1 चमचे मोहरी घाला व मोहरी तडतडु द्या. नंतर त्यात 1 चमचा जिरे घाला. जिरे सोनेरी होईपर्यंत काही सेकंद परतून घ्या. एक मोठा किंवा मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घाला. कांदे गुलाबी होईपर्यंत परता.

नंतर त्यात 10 ते 12 कढीपत्ता घाला. 2 चमचे आले-लसूण पेस्ट आणि 1 ते 2चिरलेली हिरव्या मिरच्या घाला. आले-लसूणचा कच्चा सुगंध निघत नाही तोपर्यंत नीट ढवळून घ्यावे. 1/4 चमचे हळद, 1 चमचे धणे पावडर, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गोडा मसाला घाला. सगळे मसाले नीट परतुन घ्या. नंतर चिंचेचा लगदा घाला. चिंचेचा कच्चा सुगंध जाईपर्यंत परतुन घ्या.

शिजवलेले मटकी आणि बटाटे कुकर मधुन काढून टाका. बनवलेल्या फोड़नी मधे शिजवलेले मटकी आणि बटाटे घाला. नीट ढवळून घ्यावे आणि गरज असल्यास आवश्यकतेनुसार पाणी घाला. आवश्यकतेनुसार मीठ घाला. अधूनमधून ढवळत असताना मंद आचेवर 8 ते 10 मिनिटे उसल शिजवा. शेवटी कोथिंबिरीची पाने घालून सजवा.

मिसळ पाव वाढने Garnish Serve Misal Pav

जेव्हा उसळ शिजत असेल, आपण मिसळ पावसाठी टॉपिंग्ज तयार करू शकता. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. बाजूला ठेवा. वाटी किंवा प्लेटमध्ये शिजलेली गरम उसळ काढा.

उसळ वर प्रथम चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला. नंतर चिरलेली कोथिंबीर घालावी. लिंबाचा रस काही थेंब पिळून घ्या. नंतर वरून फरसन किंवा चिवडा घाला. लिंबाचे तुकडे, चिरलेला कांदा आणि फरसन, शेव, चिवडा मिक्स करावे. मिसळ पाव सह प्लेटमध्ये सर्व्ह करा.

अश्या प्रकारे बनवा ही स्पेशल मिसळ पाव Misal Pav Recipe in Marathi आणि झंझणित मिसळ पाव चा आनंद घ्या!

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *