E RUPI ई रुपी हे डिजिटल कॅशलेस आणि कॉन्टॅकलेस पेमेंट साधन आहे. २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते विडिओ कॉन्फरेन्स द्वारे ई रुपी ची घोषणा होणार आहे. तसेच या बाबद नागरिकांना माहिती देऊन नवीन डिजिटल पेमेंट सिस्टिमचे विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्घाटन करणार आहेत. ज्यांच्या कडे स्मार्टफोन आणि बँक खाते नाहीत ते सुद्धा ई रुपी व्हाउचर्स वापरू शकतात.
नॅशनल पेमेंट कॅर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), वित्तीय सेवा विभाग, आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने पेमेंट प्रणाली तयार करण्यात आली आहे.
Table of Contents
E RUPI व्हाउचर्स कसे वापरावेत ?
व्हाउचर्स E गिफ्ट कार्ड सारखे आहे. कार्ड्स चा कोड एसएमएस किंवा QR कोड द्वारे पाठवला जातो. हे व्हाउचर्स व्यक्ती आणि उद्देश विशिष्ट असतील.
उदा. जर तुमच्या कडे E RUPI व्हाउचर्स कोविडची लस घेण्यासाठी असेल तर तुम्ही ते व्हाउचर्स फक्त लसीसाठीच वापरू शकता.
इतर ऑनलाईन अप्स पेक्षा E RUPI मध्ये काय वेगळ आहे
E RUPI अप्स नाही आहे. हे व्हाउचर्स फक्त विशिष्ट सेवेसाठी उपयोगी येणार. E RUPI व्हाउचर्स चा उद्देश विशिष्ट आणि ज्याच्या कडे बँक खाते नाही, स्मार्टफोन किंवा डिजिटल पेमेंट ऍप चा उपयोग नाही करत त्यांच्यासाठी ई रुपी व्हाउचर्स फायदेशीर आहे. याच मुळे E RUPI पेमेंट प्रणाली वेगळी आहे.
हे व्हाउचर्स आरोग्य संबंधित पेमेंट्ससाठी वापरले जातील. कॉर्पोरेट हे व्हाउचर्स त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वापरू शकतात.
केंद्राने आधी म्हटले होते कि ते लसीसाठी ई व्हाउचर्सचा पर्याय आणेल, एखादा व्यक्ती खाजगी रुग्णालयात लसीकरणासाठी ई व्हाउचर्स ची खरेदी करू शकेल आणि दुसऱ्या व्यक्ती भेट देऊ शकेल.
जो व्यक्ती व्हाउचर्स खरेदी करत आहे आणि ज्या व्यक्तीला देत आहे तो त्या व्हाउचर्स कुठे उपयोगात येत आहे याची माहिती घेऊ शकतो.
गोपनीयता हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण लाभार्त्यांना त्यांचे व्यक्तिक तपशील सामायिक करावे लागणार नाहीत.
ई रुपी व्हाउचर्स कसे उपयोगात आणावे
ई रुपी व्हाउचर्स उपयोगात आण्यासाठी कोणत्याच कार्ड आणि व्हाउचर्स च्या हार्ड कॉपी ची गरज लागणार नाही. एसएमएस द्वारे मिळालेला QR कोडच पुरेसा आहे.
E RUPI मध्ये येणाऱ्या बँकेची यादी
नॅशनल हेलथ अथॉरिटीच्या मते, ८ बँका आधीच ई रुपी मध्ये आहेत. ज्यात स्टेट बँक ऑफ इनिया, एचडीएफसी,अक्सिस, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे.
E RUPI ई रुपी माहिती आवडल्यास तुमचे मत कंमेंट द्वारे आम्हाला कळवा. आणि काही आक्षेप असल्यास आम्हाला मेल द्वारे लिहून कळवा.