English to Marathi इंग्लिश मराठी टायपिंग आता खूप सोपे झाले आहे. आता मराठी मध्ये टाईप करण्यासाठी मराठी कीबोर्ड ची गरज भासणार नाही. Google Input Tools च्या मदतीने इंग्लिश कीबोर्ड वरूनच मराठी टायपिंग करू शकतो. आपल्याला इंग्लिश मध्ये टाईप करून मराठी मध्ये रूपांतर करण्याची सरळ सोपी पद्धत आज या लेखा द्वारे आम्ही सांगणार आहोत.
English to Marathi Typing मराठी टायपिंग कशी करावी
अँड्रॉइड असो किंवा संगणक (कॉम्पुटर) आता मराठी टायपिंग करण्यासाठी आपल्याला मराठी कीबोर्ड ची गरज भासणार नाही. गूगल ने याचा तोड काढला आहे त्यासाठी गूगल ने एक्स्टेंशन (Extension) दिल आहे ज्याच्या मदतीने आपण इंग्लिश टाईप करून मराठी मध्ये रूपांतर करू शकतो.
Google Input Tools च्या सहाय्याने आपण मराठीतच नव्हे तर देशातल्या सर्वच ९० भाषा टाईप करू शकतो.
Google Input Tools कसे वापरावे
Google Input Tools एक्सटेंशन आहे. संगणक मध्ये Google Input Tools गूगल क्रोम च्या एक्स्टेंशन मध्ये इन्स्टॉल करावे लागतो.
क्रमानुसार एक्स्टेंशन कसे वापरावेत खाली वाचून आणि फोटो बघून तुम्ही इन्स्टॉल करू शकता.
१. सर्व प्रथम गूगल क्रोम चालू केल्या नंतर ३ डॉट ( ⁝ ) वर क्लिक करा.नंतर मोर टूल्स मध्ये एक्स्टेंशन वर क्लिक करा.
२. वरच्या उजव्या कोपऱ्यात एक्स्टेंशन लिहून आहे तिथे ३ लाईन ( ☰ ) वर क्लिक करा.
३. सर्वात खाली ओपन क्रोम वेब स्टोर वर क्लिक करा .
४. सर्च बॉक्स मध्ये Google Input Tools टाईप करून एंटर करा. सर्वात आधी येणारे एक्स्टेंशन वर क्लिक करून ऍड टू क्रोम करा. खाली फोटोस मध्ये बघून स्टेप्स फोलो करा.
५. नंतर एक्स्टेंशन मध्ये जाऊन Google Input Tools च्या डिटेल्स वर क्लिक करून एक्स्टेंशन ऑपशन्स वर क्लिक करा.
६. ऍड इनपुट टूल्स मधून मराठी कीबोर्ड भाषेची निवड करा आणि सिलेक्ट इनपुट टूल्स मधून तुमच्या नुसार भाषेचा क्रमांक ठरवा.
७. आता आपण English to Marathi Typing इंग्लिश मध्ये टायपिंग करून मराठी फॉन्ट मध्ये मराठी टाईपिंग करू शकतो. इंग्लिश मध्ये टाईप करून स्पेसबार दाबून मराठी मध्ये फॉन्ट दिसतो. खाली फोटो बघितल्या नंतर लक्षात येईल.
नोट: URL मध्ये मराठी फॉन्ट मध्ये टाईपिंग होत नाही.
English to Marathi भाषा बदलण्यासाठी शॉर्टकट कीज
इंग्लिश ते मराठी आणि मराठी ते इंग्लिश झटपट बदलण्यासाठी शॉर्टकट कीज वापरू शकता.
ALT+SHIFT+N पुढील इनपुट वर स्वीच करण्यासाठी
ALT+SHIFT+R वापरलेल्या शेवटच्या इनपुट मध्ये वापस येण्यासाठी
ALT+SHIFT+ T वर्तमान इनपुट वापरण्यासाठी
या लेखा बद्दल काही आक्षेप असल्यास आम्हाला मेल द्वारे कळवा. English to Marathi या लेखा बद्दल तुमचे मत कंमेंट द्वारे आम्हाला सांगा.